मुंबईतील खारमध्ये मंगळवारी रात्री एका कोरियन युट्युबरची दोन तरुणांनी छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार युट्युबरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये एका मुंबईकर तरुणानं पाहिला आणि तिची सुटका केली. याप्रकरणी आरोपी दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून खुद्द मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतलेली दिसली